Bank News मुंबई : सरकारने 500 रुपयांच्या 8810.65 दशलक्ष नोटा छापल्या होत्या, पण रिझर्व्ह बँकेकडे फक्त 7,260 दशलक्ष नोटा पोहोचल्याचं आरटीआयमध्ये उघड झालं होत. (Bank News) मात्र बाजारातून 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याच्या वृत्ताचे आरबीआयने खंडन केले असून, याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. (Bank News) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 88 हजार कोटी रुपयांच्या नोटा गहाळ झाल्याचा माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांचा दावा फेटाळला आहे. (Bank News)
प्रिटिंग प्रेसमधून मिळालेली माहिती चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आली आहे. प्रिटिंग प्रेसमध्ये छापलेल्या नोटा सुरक्षित असतात. त्याच्या निर्मितीपासून वितरणापर्यंत मजबूत यंत्रणा आहे. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीचा चुकीचा अर्थ काढला गेला असल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. प्रिंटिंग प्रेसमधून देण्यात येणाऱ्या प्रत्येक नोटेची मोजणी आणि नोंद केली जाते, आरबीआयकडून दिल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवा, असं देखील आवाहन करण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण
हिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी 2015-16 या आर्थिक वर्षात आरबीआयकडे एकूण जमा झालेल्या नोटा व त्यांचे मूल्य यांची माहिती मागवली होती. सोबतच नाशिक, देवास व म्हैसूर येथील नोट प्रेस मधून त्याच आर्थिक वर्षात प्रिंटींग करून पाठवलेल्या नोटांची संख्या व मूल्य हीसुद्धा माहिती मागवली होती.
दरम्यान, आरबीआय आणि नोट प्रेस यांनी दिलेल्या आकडेवारीत तफावत दिसल्यानं रॉय यांनी म्हटलं होतं की, 88 हजार 32 कोटी 50 लाख रुपये मूल्य असलेल्या नोटा गायब आहेत. त्यावरून देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे.