Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विठ्ठलावर निस्सिम भक्ती असणारे बाळासाहेब रायसोनी यांचे निधन…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 15 November 2022, 10:37

सागर जगदाळे 

भिगवण : येथील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ऊर्फ बाळासाहेब गौतमचंद रायसोनी (वय. ५५) यांचे रविवारी (ता.१३) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. दोन वर्षापुर्वी कोरोनांमुळे त्यांची आरोग्यस्थिती खालावली होती. काही दिवसांपुर्वी त्यांच्यावर पुणे येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यांची आरोग्यस्थिती सुधारत असतानाच अचानक रविवारी (ता.१३) सायंकाळी हदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भिगवण परिसरावर शोककळा पसरली. भिगवण परिसरातील सच्चा विठ्ठलभक्त हरपला अशी भावना परिसरातुन व्यक्त केली जात आहे.

रविंद्र रायसोनी हे किराणा मालाचे व्यावसायिक होते. रविंद्र सेल्सच्या माध्यमातून त्यांनी प्रामाणिक व्यावसायिक अशी त्यांची प्रतिमा भिगवण व परिसरामध्ये निर्माण केली होती. वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांना त्यांचे वडील गौतमचंद रायसोनी यांच्याकडून आल्याने पुढे १९८५- ९० दरम्यान ह.भ.प.विठ्ठल महाराज घुले यांचा सहवास लाभल्याने त्यांच्या विचाराने ते विठ्ठल भक्तीत अधिक प्रभावित झाले .

 

पुढे विठ्ठल भक्ताची सेवा करण्यासाठी त्यांनी वडील गौतमचंद रायसोनी यांचे स्मृती प्रित्यर्थ  गौतम स्मृती फांऊडेशनच्या माध्यमातून गुरुवर्य वै. विठ्ठल महाराज घुले यांच्या स्मरणार्थ आजवर १२ पुण्यतिथी सोहळा साजरा करत यानिमित्ताने किर्तन महोत्सव व परिसरातील आठशे विठ्ठल भक्तांना चारधाम तीर्थ यात्रा, पंढरपुर यात्रा आदी उपक्रम राबविले. किर्तन महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आघाडीच्या किर्तनकारांची अनेक किर्तने त्यांनी आयोजित केली.

भिगवण व परिसरांमध्ये विठ्ठलभक्त म्हणुन ते  परिचित होते. त्यानी गेली अनेक वर्षे भिगवण येथे काकड आरती सुरु केली. कोरोना काळांमध्ये त्यांनी अनेक गरजुंना त्यांनी वैदयकिय मदत केली. त्यांनी शेवटच्या क्षणी विठ्ठल भक्तीच केली. संत तुकाराम यांच्या अभंगवानीतील “आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा” असे उद्गार काढतच अखेर त्यांनी सखे सोयरे यांचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त करत एक सच्चा विठ्ठलभक्त, प्रामाणिक व्यावसायिक व हाडाचा सामाजिक कार्यकर्ता हरपला अशी भावना परिसरातुन व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

व्यावसायिक आनंद रायसोनी व प्रफुल्ल रायसोनी हे त्यांचे पुत्र तर एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उमाकांत रायसोनी हे त्यांचे बंधु होत. सोमवार सकाळी १० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यासाठी रथयात्रेतुन त्यांना गावातील मुख्य चौकातून टाळ मृदुंग वाजवत हरिनामाचे गजर करत त्यांच्यावर भिगवण वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

पुण्यात ७९५ पदांसाठी पोलीस भरती सुरु : अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.