वाघोली : बकोरी – बकोरी फाटा ते वाघोली यादरम्यानच्या रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झाली आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुटीत धरून गाडी चालवावी लागत आहे.
बकोरी – बकोरी फाटा ते वाघोली असा सुमारे ६ किलोमोटारचा रस्ता आहे. बकोरी फाटा ते राधेश्वरि नगरी पर्यंत शेतकरी व प्रशासनाचा न्यायालयात वाद चालू असल्याने त्याठिकाणी वाहणे चालवताना कसरत करावी लागते. पुढे मगरवस्तीपर्यंत पीएमआरडीचे माध्यमातून रस्ता झाला आहे. परंतु, तेथून पुढे ४ किलोमोटारचा रस्ता खुप खराब झाला आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातून वाहणे चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. परिणामी या रस्त्यावरत अनेक अपघात घडले आहेत.
वाघोली सारख्या शहराजवळ असलेल्या बकोरी गावाला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामध्ये बकोरी, पेरणे,बकोरी,बोल्हाई, बकोरी- वाघोली हे सर्व रस्ते खराब झाले आहेत. गावची ग्रामपंचायत सक्षम नाही कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नाही. गावात कंपनी आहे परंतु गेले अनेक वर्षांपासून कर भरत नाही.अनेक वेळा पत्र व्यवहार केला परंतु आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी गावासाठी गेले ५ वर्षात एकही दमडी गावाला निधी उपलब्ध करून दिला नाही.
याबाबत बोलताना माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे म्हणाले कि, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तुम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा पत्र दिले आहे. तरी तुम्ही गावाच्या विकासासाठी निधी देणार नसेल तर पुन्हा गावात मत मागायला येऊ देणार नाही. तसेच तुमच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर बोंबाबोंब आंदोलन करणार आहे.