Bailagada News : भिगवण : इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त मदनवाडी केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन मदनवाडी गावात करण्यात आले होते. परंतु, या बैलगाडा शर्यतीला ‘फिक्सिंग’चे गालबोट लागल्याने बैलगाडा मालक शर्यतीतून निघून गेल्याचे पाहायला मिळाले. संयोजकांनी आपल्याच गाड्या उपांत्य फेरीत येण्यासाठी जी हातचलाखी केली ती हातचलाखी बैलगाडा मालकांच्या नजरेतून मात्र सुटली नाही.(Bailagada News)
बैलगाडा शर्यतीचे आयोजन मदनवाडी गावात करण्यात आले होते.
महाराष्ट्रात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून समजल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतीला या चिट्टीच्या नुरा डावामुळे बदनामीचा डाग लागल्याचे वास्तव शर्यत शौकिनांना पाहावयास मिळाले. तर फिक्सिंग झाली नाही असे आयोजक कुंडलिक बंडगर यांनी सांगत योग्य आणि नियमात स्पर्धा चालू असताना तालुका कमिटी आणि जिल्हा कमिटीतील अंतर्गत कलहामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
बैलगाडा मालक मैदानातून बाहेर
इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने मदनवाडी येथे मदनवाडी केसरी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातून अनेक बैलगाडा मालकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. (Bailagada News)या स्पर्धेत २९२ बैलगाडा मालकांनी १००० रुपये प्रवेश फी भरून प्रवेश घेतला असल्याची माहिती मिळाली. मात्र, या स्पर्धेदरम्यान ढिसाळ नियोजन आणि स्थानिक बैलगाडा मालकांना झुकते माप देवून त्यांना थेट उपांत्य फेरीत घेण्याला सर्व गाडी मालकांनी विरोध करत मैदान सोडणे पसंत केले.
अटी आणि शर्थीच्या उल्लंघनाचा आरोप
जर स्थानिक गाडामालकांनाच उपांत्य फेरीत खेळवायचे होते तर एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या आयोजन कशासाठी केले असा उद्विग्न सवाल बैलगाडा मालकांनी केला. तर या स्पर्धेदरम्यान अनेक अटी आणि शर्थीचे उल्लंघन झाले तरी प्रशासन राजकीय दबावापोटी गप्प राहिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
बैलगाडा मालकांचा फिक्सिंग मैदानात परत न येण्याचा निश्चय
राज्यभरात नावाजलेले बैलगाडा मालकांनी प्रवेश फी भरून सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रामुख्याने मुळशीचा बकासुर, शेवाळे यांचा बावऱ्या तर कलेढोणकरांचा लक्ष्मणरावसारख्या नामांकित बैलगाडा मालकांनी हजारो रुपये खर्चून हजेरी लावली होती.(Bailagada News) मात्र, स्थानिक बैलगाडा उपांत्य फेरीत यावे यासाठी चिठ्यात केल्या गेलेल्या हात चलाखीमुळे नामांकित बैलगाडा मालकांनी स्पर्धेतून माघार घेण्याचे पसंत केले व अशा फिक्सिंग मैदानात परत न येण्याचा निश्चय केला.
समालोचकांनी सोडले व्यासपीठ
राज्यभरात बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून आपल्या आवाजाची ओळख निर्माण करणाऱ्या समालोचक सुनील मोरे यांनी चिठ्ठी काढण्यात होत असलेल्या प्रकारची माहिती मिळताच स्टेज सोडल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र,(Bailagada News) आयोजक स्थानिक गाड्या उपांत्य फेरीत येण्यासाठी करत असलेल्या विषयाची माहिती बैलगाडा संघटना पदाधिकारी आणि मालक यांना देऊन मोरे निघून गेले.
चुकीचे प्रकार घडणाऱ्या ठिकाणी बैलगाडा मालकांनी जावू नये
मदनवाडी येथे झालेल्या शर्यतीदरम्यान स्थानिक बैलगाडा उपांत्य फेरीत येण्यासाठी तालुका कमिटीतील सदस्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केले आणि याची माहिती कदाचित आयोजकांना नसेल असे सांगितले. तर भविष्यात असे चुकीचे प्रकार घडणाऱ्या ठिकाणी राज्यातील बैलगाडा मालकांनी जावू नये, असे आवाहन अखिल भारतीय बैलगाडा अध्यक्ष नितीन शेवाळे यांनी केले.(Bailagada News)
प्रेक्षकामध्ये बैलगाडा घुसल्याने एकजण गंभीर जखमी
शर्यतीदरम्यान प्रेक्षकांमध्ये बैलगाडा घुसून एक प्रेक्षक गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. तर दोन लहान मुले गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी जबाबदार यंत्रणेविरोधात गुन्हा नोंदवला जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
काही मालकांनी अडेलपणाची भूमिका घेतल्याने प्रकार
समृद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुस्ती मैदान, दहीहंडी उत्सव तसेच अनेक मैदानी खेळाच्या प्रकारचा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. तरुणांना मैदानी खेळाची माहिती मिळावी आणि त्यांची जिंकण्याची तयारी व्हावी हा मूळ उद्देश असतो. काल झालेल्या मदनवाडी केसरी बैलगाडा स्पर्धा अत्यंत शिस्तीने आणि नियमाने सुरु होती. मात्र, तालुका कमिटी आणि जिल्हा कमिटी यांच्यात योग्यप्रकारे समन्वय नसल्यामुळे गैरसमज निर्माण झाला आणि आपलाच गाडा मध्यभागी धावेल अशी अडेलपणाची भूमिका काही मालकांनी घेतल्यामुळे सदर प्रकार घडला असल्याचे समृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुंडलिक बंडगर यांनी सांगितले.(Bailagada News)
अतिउत्साही प्रेक्षक अनेकवेळा सांगूनही धावपटीवर
मदनवाडी केसरी बैलगाडा शर्यतीला शासनाची परवानगी होती. भिगवण पोलिसांनी योग्यप्रकारे बंदोबस्त लावला होता. काही अतिउत्साही प्रेक्षक अनेक वेळा सांगूनही धावपटीवर जात होते. त्यांना पोलीस आवरण्याचे काम करत होते. एक व्यक्ती बैलगाडा अंगावर गेल्यामुळे जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.(Bailagada News)