पुणे : हडपसर रामटेकडी येथे पूर्ववैमनस्यातून घरामध्ये घुसून मारहाण व जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा’ (मोक्का) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टोळीतील ओमकार मारुती देडे (Omkar Dede) याचा जामीन अर्ज कोर्टाने मंजूर केला. मोक्काचे विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांच्या कोर्टाने सशर्त जामीन मंजूर (Bail granted) करण्यात आला आहे.
ओमकार मारुती देडे (वय20, रा. सर्वे नंबर 110, रामटेकडी ) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये पूर्व वैमन्यासातून भांडणे झाली. भांडणामध्ये आरोपीनी फिर्यादीला घरात घुसून जबरी मारहान व जीव घेण्याचा प्रयत्न केला. या कारणास्तव फिर्यादी यांनी आरोपी विरुद्ध हडपसर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर ‘मोक्का कायद्याच्या कलम 21(4) नुसार कारवाई करण्यात आली.
आरोपीतर्फे ॲड. राधिका भिसे, ॲड. शामराव कांबळे, ॲड. अवधूत देवधर आणि ॲड. स्नेहा ओरे यांनी काम पाहिले.
यावेळी ॲड. राधिका भिसे म्हणाल्या, आरोपीवर यापूर्वी कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे दाखल नव्हते. आरोपीवर कोणत्याही न्यायालयीन केसेस चालू नाहीत. सहगुन्हेगार यांनी आरोपीचे नाव घेतले होते. आरोपीला कोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याकारणाने आरोपीला जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला.