उरुळी कांचन, (पुणे) : गांधीवादी स्व. पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई यांनी स्थापन केलेली बायफ संस्था आज भारतातील १२ राज्यातील ३२५ जिल्ह्यांतील ९६ हजार ७३८ गावांमध्ये कार्यरत आहे. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कार्यक्रमाने वाळवंटी प्रदेशातील ३०० खेड्यांमधील कुटुंबांचे जीवन बदलले असल्याचे मत बायफचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त भरत काकडे यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बायफ मध्यवर्ती संशोधन केंद्र येथे बायफ स्थापना दिन समारंभ दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काकडे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य महाप्रबंधक, नाबार्ड, पुणेचे जी.एस. रावत सहयोगी उपाध्यक्ष व मुख्य सी.एस. आर. हिंदुस्थान झिंक लिमिटेड उदयपुरच्या अनुपम निधी, गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दुध उत्पादक संघ कोपरगावचे अध्यक्ष राजेश परजणे आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत बायफचे अध्यक्ष हृषीकेश मफतलाल म्हणाले, “यांनी बायफमध्ये गेल्या एका वर्षात देशी जातीच्या भ्रूण हस्तांतरण तंत्रज्ञानाचा प्रचार, वाडीमार्फत जमा झालेला कार्बन, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनातील अग्रगण्य काम, उरुळी कांचन मध्ये किसान मार्टचे लोकार्पण याद्वारे बायफमध्ये झालेल्या विस्ताराचे व विकासाचे कौतुक केले आणि संस्थेला सहकार्याच्या तत्त्वांपासून विचलित होण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि शेतकऱ्यांना लक्षात ठेवून पुढे जाण्याचा सल्ला दिला.
सहयोगी उपाध्यक्ष व प्रमुख सी. एस. आर. हिंदुस्तान झिंकच्या अनुपम निधी म्हणाल्या, “यांनी संस्थात्मकीकरण आणि जीवनातील चार गुणांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता जसे की “अन्न”, “अक्षर”, “आरोग्य” आणि “अन्नसुरक्षा”, तसेच तंत्रज्ञानाचे डिजिटलायझेशन, शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून क्लस्टर स्तरावर वाढ, तंत्रज्ञान विकास, महिलांचा सहभाग आणि शेती व्यवसाय म्हणून केली पाहिजे.”
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ कोपरगावचे अध्यक्ष राजेश परजणे म्हणाले, “बायफ आणि गोदावरी दूध संघ यांच्यातील प्रदीर्घ संबंधावर प्रकाश टाकला. दुग्धोत्पादनाला गती देण्यासाठी बायफने नाबार्ड, सरकारी योजनांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यावर अधिक भर दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक, श्री. जी. एस. रावत यांनी बायफ आणि नाबार्ड यांच्यातील संबंध आणि बायफसोबतच्या वाडी कार्यक्रम यावर भर दिला, तसेच भविष्यात कृषी आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. पर्यावरणाचे संगोपन करताना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करा आणि डेटा निर्मितीच्या सत्यतेवर आणि डेटा विश्लेषणावर भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला.
दरम्यान, विविध पुरस्कार देण्यात आले होते. बायफच्या वार्षिक अहवाल, संशोधन अहवाल, कृषी जैवविविधता संवर्धनावरील ४ पुस्तके आणि अझोला उत्पादन वरील २ पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक पेपर्स आणि केस स्टडीज, संशोधन संघ आणि उरुळीकांचन येथील सर्वोत्कृष्ट शेतमजूर यांना पुरस्कार अशा इतर पुरस्कारांच्या श्रेणी होत्या.
सदर कार्यक्रमास ऊरुळीकांचन, टिळेकरवाडी, कोरेगावमुळ, भवरापूर येथील मान्यवर, प्रगतशील शेतकरी तसेच सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे विविध सरकारी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. अशोक पांडे, उपाध्यक्ष, बायफ यांनी सर्वांचे स्वागत केले तर डॉ. जयंत खडसे, संशोधन संचालक, बायफ यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल पुंडे, जेष्ठ प्रकल्प आधिकारी, बायफ यांनी केले.