नवी दिल्ली : दुचाकी वाहनांसोबतच चारचाकी वाहन खरेदीला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कारण, याची मागणीही वाढत आहे. असे असताना आता जर तुम्ही नववर्षात कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. कारण, BMW, मर्सिडीजसह मारुती, ह्युंदाई कंपनीच्या कार होणार महाग होणार आहेत.
नवीन वर्षापासून मारुती कार 4 टक्क्यांनी महाग होणार आहेत. तर Hyundai India, Mercedes Benz, BMW आणि Audi यांनीही किमतीत वाढ जाहीर केली. Hyundai Motor India नंतर, भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने देखील पुढील महिन्यापासून कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या लाईनअपच्या सर्व मॉडेल्सवर ही वाढ 4 टक्क्यांपर्यंत असेल. वाढलेले दर एक जानेवारी 2025 पासून लागू होतील.
मारूती सुझुकीने शुक्रवारी (दि.6) एका एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली. एक दिवस आधी गुरुवारी Hyundai Motor India Limited ने देखील नवीन वर्षापासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती 25,000 रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मारूतीने ही दरवाढ केली आहे.