धाराशिव : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे आमदार घेऊन गेल्यावर दोन आमदारांना मारहाण करण्यात आली होती. तसेच, स्पाईस जेट व इंडिगो या विमान कंपनीच्या महिला एअर होस्टेस यांचा शिंदे सेनेतील आमदारांनी विनयभंग व लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये इतर लोकांना प्रवेश नव्हता, दारूच्या नशेत झिंग होऊन हे सगळे तिथे गेले होते असा गंभीर असीम सरोदे यांनी केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, शिवसेना फोडत असतांना भाजपच्या माध्यमातून जो घोडेबाजार झाला, त्यामध्ये एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गुवाहाटीला गेले. मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून सांगत आहे. जी माहिती आतापर्यंत कधीही पुढे आलेली नाही. गुवाहाटीच्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेला, मात्र आठ किलोमीटरवरून त्यांना परत पकडून आणण्यात आले.
त्यानंतर त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली. तसेच आणखी एका आमदाराला मारहाण झाली. त्या दोन्ही आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे. गुवाहाटीच्या ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमध्ये इतर कोणत्याही ग्राहकांना परवानगी नव्हती. मात्र, स्पाईस जेट व इंडिगो या कंपनीकडून आधीपासूनच या हॉटेलमध्ये काही रूम बुक करण्यात आलेल्या होत्या. त्यांचा तो वार्षिक करार होता. त्यामुळे हॉटेलच्या वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या.
माझा प्रश्न आहे, त्या हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेला. एअर होस्टचा विनयभंग व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला हे महाराष्ट्राने शोधले पाहिजे. याचं खरं चरित्र आपल्या समोर येईल. दारूच्या नशेत झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या-मोठ्या मंत्री पदावर बसले असले, तरीही या पैश्याचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही, असं असीम सरोदे म्हणाले.