मुंबई : गेल्या लोकसभेत नामुष्की ओढवलेल्या महायुतीने राज्यात विधानसभा निवडणुकीत मात्र जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला अक्षरशः लोळवले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला जेमतेम 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. महायुतीला मिळालेला हा अनपेक्षित अंदाज पाहून महाविकास आघाडीतील नेत्यांनी हे सर्वाकाही अपेक्षित होत, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत लोकांचा मिळालेला प्रतिसाद बघत, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास प्रतिकूल असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे राज्यात लवकरच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या एतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका दिसत आहे. भाजपा बावनकुळे यांच्याच नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे बोलले जात आहे.
अनेक वर्षांपासून प्रशासकांमार्फत कारभार..
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात महापालिकेसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा प्रशासकांमार्फत चालवला जात आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर निवडणूक घेऊन लोकप्रतिनीधींच्या मार्फत विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी होत असताना. असे असतानाच आता विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर येणाऱ्या काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा?
भाजपा – 132
शिवसेना (शिंदे गट) – 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 41
काँग्रेस – 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2