Ashadhi Ekadashi News : छत्रपती संभाजीनगर : राज्यात गेल्या काही महिन्यांत क्षुल्लक कारणामुळे हिंदू- मुस्लिम दंगली घडत आहेत. दोन्ही धर्मांमध्ये विद्वेषाचे वातावरण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 29 जून रोजी आषाढी एकादशी तसेच मुस्लीम समुदायाचा पवित्र सण बकरी ईद एकाच दिवशी आले आहेत. या पवित्र दिवशी धार्मिक दंगे उसळू नयेत, यासाठी यंदा संभाजी नगरमधील मुस्लिमांनी आषाढीच्या दिवशी येणाऱ्या ईदला कुर्बानी न देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.(Ashadhi Ekadashi News)
महिन्यांत क्षुल्लक कारणामुळे हिंदू- मुस्लिम दंगली घडत आहेत.
सोमवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लीम बांधवांकडून बकरी ईदची जय्यत तयारी सुरू आहे. सर्वत्र उत्सवाचं वातारण आहे. तर, दुसरीकडे टाळ मृदुंगाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात वारकरी पंढरपूरच्या वाटेने निघाले आहेत. वारीसाठी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. विठुरायाच्या नामात मंत्रमुंग्ध होऊन वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात आहे. अख्ख्या महाराष्ट्र विठुरायाच्या भक्तीत डुंबला आहे. आषाढी एकादशीला कधी पंढरपूरला पोहचतो असे वारकऱ्यांना वाटायला लागले आहे.(Ashadhi Ekadashi News)
दरम्यान, यंदा २९ जून रोजी आषाढी एकादशी येत असून त्याचदिवशी बकरी ईद हा मुस्लिमांचा सणही येत आहे. सद्याची राज्यातील परिस्थिती पाहता एकाच दिवशी येणारे हे दोन्ही सण शांतेत साजरे करण्यात यावेत असा पोलिसांचा प्रयत्न आहे. (Ashadhi Ekadashi News)त्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या वाळूज पोलिसांनी वाळूज भागातील पंढरपूर येथे असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शांतता समितीची बैठक बोलावली होती. यावेळी झालेल्या बैठकीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुस्लीम समाजाकडून घेण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे बकरी ईद साजरी करण्यासाठी तीन दिवसांचा अवधी आहे. या तीन दिवसांमध्ये कधीही हा उत्सव साजरा करता येतो. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुर्बानी करण्याचं देखील या बैठकीत निर्णय झाला. आषाढी एकादशीला वारकऱ्यांचा उपवास असतो. त्यामुळे हिंदू बांधवांच्या भावनांचा अवमान होऊ नये यासाठी वाळूजच्या मुस्लीम बांधवांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.(Ashadhi Ekadashi News)
एकादशीच्या दिवशी आपण उपवास करीत सर्वांना सुखी ठेव ही प्रार्थना करतो. त्यामुळे हिंदूंना त्रास होऊ नये, यासाठी मुस्लिमांनी दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहेत.(Ashadhi Ekadashi News) हा निर्णय चांगला असल्याने मुस्लीम बांधवांचे कौतुक केले जात आहे. राज्यातील सगळ्याच जिल्ह्यांतील पोलिसांनी अशी सामंजस्याची भूमिका घेतल्यास राज्यात दोन धर्मांत दंगली पेटणार नाहीत, अशी प्रतिक्रीया देखील व्यक्त होत आहे.(Ashadhi Ekadashi News)
दरम्यान, मुस्लीम बांधवांचा बोकड खरेदीकडे कल वाढला असल्याने बाजारात बोकड विक्रीस दाखल झाले आहेत. परंतु वादळवारा आणि पावसामुळे बोकडांच्या दरावर परिणाम झालेला दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बोकडाच्या दरामागे तीन ते चार हजार रुपयांची वाढ झाली आहे.(Ashadhi Ekadashi News)