IND vs AUS : टीम इंडियाचा स्टार प्लेयर विराट कोहली बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमुळे सद्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. विराटची ऑन फिल्ड मस्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट नेहमीच पंगा घेताना दिसतो. अशातच आता विराटने चौथ्या कसोटीत 36 धावांची खेळी केली. मात्र, विराट आऊट झाल्यावर एक मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून आले.
नेमकं काय घडलं?
विराट कोहलीने यशस्वी जयस्वाल या दोघांनी दमदार भागेदारी केली. त्यामुळे टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला होता. परंतु एका चुकीमुळे यशस्वी जयस्वाल बाद झाला. त्यानंतर विराट देखील लगेच पुढच्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. विराट आऊट होऊन ड्रेसिंग रुममध्ये जात असताना प्रेक्षकांनी विराटला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. काही वेळ विराटला बूबूबूबू देखील केलं गेलं. मात्र, ड्रेसिंग रुममध्ये जात असताना विराटचा पारा चढला.
Virat Kohli almost recreated that incident with a CSK fan at Wankhede 😭😭 pic.twitter.com/35qDBKxuv3
— Pari (@BluntIndianGal) December 27, 2024
विराट जात असताना एका प्रेक्षकाची कमेंट विराटला आवडली नाही. त्यामुळे विराट पुन्हा मागे आला अन् प्रेक्षकाला उत्तर द्यायला लागला. त्यावेळी सेक्युरीटी स्टार्फने विराटची समजूत घातली अन् त्याला पुढे जाण्याचा सल्ला दिला. विराट देखील संतापलेल्या परिस्थिती ड्रेसिंग रुममध्ये गेला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन – उस्मान ख्वाजा, सॅम कोन्सटास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर) नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.