पुणे : भगवान विष्णूला समर्पित हरिशयनी एकादशी 10 जुलै रोजी आहे. तिला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. एकादशीपासून चातुर्मास सुरू होणार असून तो ४ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या दरम्यान चार महिने मांगलिक काम बंद राहणार आहे. ब्रह्मांडाचे पालनकर्ता भगवान विष्णू चार महिने योगनिद्रामध्ये राहतील. चातुर्मास हा आध्यात्मिक शक्ती जागृत करण्याचा काळ मानला जातो.
ज्योतिषशास्त्रात 12 राशी आहेत. या 12 राशींपैकी 4 राशींवर चातुर्मासात विशेष कृपेचा वर्षाव होईल. या 4 राशींना या 4 महिन्यांत नशिबाची पूर्ण साथ मिळेल. चला जाणून घेऊ कोणकोणत्या राशींना फायदा होणार ते..
मेष :
मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. कामात यश मिळेल. नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. नफा होईल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल.
मिथुन–
तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. धन आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा आणि पदात वाढ होईल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना शुभ परिणाम मिळतील. लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल.
कन्या :
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. लक्ष्मीच्या कृपेने धन आणि लाभ होईल, त्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही.
सिंह-
सिंह राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक बाजू मजबूत राहील. नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. हा काळ विद्यार्थ्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. वैवाहिक जीवन आनंदी राहील.