Tuesday, June 10, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नळदुर्ग आणि अणदूर येथील खंडोबाला तब्बल ६१ किलो चांदीचे सिंहासन…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 30 July 2022, 17:53

सुरेश घाडगे 

उस्मानाबाद : नळदुर्ग आणि अणदूर येथील खंडोबाला ६१ किलो चांदीचे सिंहासन बनविण्यात आलेले आहे. आणि या सिंहासनासाठी तब्बल ३८ लाख रुपये खर्च आला आहे. आणि हे सिंहासन बनविण्यासाठी २१ दिवस लागले आहेत.

महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग येथे झाल्याची आख्यायिका आहे. या ठिकाणी महाराष्ट्रासह, परिसरातून कर्नाटक,आंध्रप्रदेश येथून लाखोंच्या गर्दीने भाविक येतात. भाविक येथे नवस हा पशू बळी देऊन नाही तर भंडारा उधळून पूर्ण करतात. तसेच या मंदिरासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व छत्रपती शाहू महाराज यांनी या मंदिराचा सभामंडप बांधण्याचा उल्लेख आढळतो.

मंदिरातील पूर्वीचे सिंहासन हे पितळी होते. त्याची झीज झाली होती. त्यामुळे ते बदलून लातूर येथील कारागीरांच्या माध्यमातून सागवानी सिंहासन तयार करण्यात आले. नंतर याला पुढे नाशिक येथील कारागीर परेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून चांदी मढवण्यात आली आहे. हे सिंहासन बनविण्यासाठी साधारणत: ६१ किलो ९९% शुद्ध चांदीचा उपयोग झाला असून अंदाजे ३८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

अणदूरचे मंदिर तीन टप्प्यात झाले आहे. पुढे नळदुर्ग आणि अणदूरमध्ये देवाच्या मूर्तीसाठी वाद सुरू झाला. त्यानंतर अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने देवाची मूर्ती ठेवण्याचा करार झाला. तो करार आजही पाळला जातो. अणदूर येथील ठिकाणी देवाचे वास्तव्य हे १० महिने व ऊर्वरित २ महिने हे कर्नाटकातील खानापूर येथे असते.

या दोन्ही मंदिराचे पुजारी एकच असून, ट्रस्ट सुध्दा एकच आहे. जेव्हा देवाची मूर्ती अणदूरला असते तेंव्हा नळदुर्गच्या मंदिरात फक्त शिवलिंग दिसते, श्री खंडोबा महादेवाचा अवतार असल्याने मूर्तीच्या खाली शिवलिंग दिसते. श्री खंडोबाची मूर्तीही एक शिवलिंग असून, त्यावर हळदीचा लेप लावून नाक, डोळे बसविले जातात. त्यावर चांदीचा किरीट चढवला जातो. सकाळ आणि रात्री दोन वेळा सोहळ्यात पूजा केली जाते. रात्री शेजारती म्हटली जाते. दोन्ही पूजेच्या वेळी नगारा वाजवला जातो. तो मान मुस्लिम भक्त याकूब शेख यांच्याकडे आहे.

दोन मंदिरे, मूर्ती एक : या खंडोबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अणदूर आणि मैलारपूर या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत. यातील अंतर ४ किलोमीटरचे आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. मंदिरे दोन पण मूर्ती एक अशी शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. तसेच अणदूरहून नळदुर्गला आणि नळदुर्गहून अणदूरला देवाची मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यांमध्ये लेखी करार केला जात असल्याची माहिती श्री खंडोबा मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी दिली.

दरम्यान, उस्मानाबाद – सोलापूर या महामार्गावर उस्मानाबाद पासून ५५ किमी व सोलापूर पासून ४० किमी अंतरावर अनदूर आणि नळदुर्ग या दोन गावा दरम्यान हे प्राचिन मंदिर आहे. पहाटे ६ वाजता दररोज खंडोबाची आरती केली जाते. दिवसभर मंदिर दर्शनासाठी खूले असते. रात्री ८ वाजता आरती करून प्रसाद वाटला जोतो त्यानंतर मंदिर बंद केले जाते.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात एटीएममध्ये फसवणूक करणारे उत्तर प्रदेशातील दोन चोरटे जेरबंद; लोखंडी पट्टीचा वापर करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक

Tuesday, 10 June 2025, 18:10

Breaking News: स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांच्या चारचाकी गाडीला अपघात; रांजणगाव परिसरात पुणे-अहिल्यानगर महामार्गावर खळबळ…..

Tuesday, 10 June 2025, 18:00

नाझरे धरणाच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या भाविकांचे साडेचार लाखांचे सोने चोरीला; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल    

Tuesday, 10 June 2025, 17:46

धार्मिक परिसरात कत्तलखाना नकोच! मोशीतील कत्तलखान्याचे आरक्षण मागे घेतले जाणार…

Tuesday, 10 June 2025, 17:42

तळीरामांच्या खिशाला कात्री; मंत्रिमंडळात महत्वाचा निर्णय

Tuesday, 10 June 2025, 17:41

लोणी काळभोर येथील बारावीच्या विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेले; एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल

Tuesday, 10 June 2025, 17:24
Next Post

जनाई शिरसाई उपसा सिंचन योजेनच्या पाण्याचे रोटीत आमदार राहुल कुल यांच्या हस्ते जलपुजन...!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.