पुणे : नागपूर येथील आर्मी पब्लिक स्कूल येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
आर्मी पब्लिक स्कूल, कामठी, नागपूर येथे पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), प्राथमिक शिक्षक (PRT) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कामठी, नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 29 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), प्राथमिक शिक्षक (PRT).
– एकूण रिक्त पदे : 29 पदे.
– नोकरीचे ठिकाण : कामठी, नागपूर.
– वयोमर्यादा : 40-57 वर्षे.
– शैक्षणिक पात्रता : PGT : (B.Ed सह संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन) TGT, PRT: B.Ed सह संबंधित विषयात पदवी).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2025 (1500 तास.).
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : स्कूल ऑफिस, आर्मी पब्लिक स्कूल कामठी, द मॉल रोड, कामठी कँट, नागपूर-जबलपूर रोडवर, पिन- 441001.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.apskamptee.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.