पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. कारण, पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – III, डेटा एंट्री ऑपरेटर, मल्टी-टास्किंग स्टाफ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 6 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये बारावी उत्तीर्ण, डिप्लोमा, विज्ञानातील पदवीधर, पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 18,000 ते 67,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 ऑक्टोबर 2024 असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी [email protected] या मेलवर अर्ज पाठवता येणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://afmc.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.