पुणे : आधुनिक काळात बदलत्या लाईफस्टाईलमुळे लहान मुलांनासुद्धा आरोग्यासंबंधितच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. लहान मुलेही डिप्रेशनमध्ये जात आहेत. याची प्रकरणे गेल्या काही काळापासून वाढत चालली आहेत. यामुळे पालकांना मुलांची अधिक चिंता सतावू लागली आहे. हसती-खेळती मुले प्रत्येकालच आवडतात. मात्र, मुले अधिक शांत शांत, एकटी राहत असतील तर त्यांच्या मनात काहीतरी चाललेले असते हे नक्की. पण ते कसे ओळखायचे आणि ते खरंच नैराश्येचा सामना करतायत का? याचबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेऊयात.
मुले एकटं राहणं पसंत करत असतील तर…
जर तुमची मुलं काही आठवडे, महिने उदास, निराश राहत असतील अथवा एकटे राहणे पसंद करत असतील तर समजून जा त्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय. अशावेळी मुलांकडे लक्ष देणे फार गरजेचे असते. याशिवाय, जर मुले स्वतःशीच बोलत असतील, एकट्यातच काहीतरी पुटपुटत असतील किंवा अचानक गोष्टी फेकून देत असतील तर पालकांनी समजून जावे मुलं डिप्रेशनमध्ये आहे.
खाण्याकडे दुर्लक्ष करत असतील तर…
मुले दीर्घकाळापासून व्यवस्थित खात पीत नसतील किंवा झोपही त्यांची पूर्ण होत नसेल तर ते एका समस्येत असू शकतात. अशावेळी पालकांनी त्यांच्याशी बोलले पाहिजे. मुलांना डिप्रेशनच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी पालकांनी त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. त्यांच्या आवडीच्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दलही विचारले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलाशी मित्रत्वाचे नाते तयार केले पाहिजे.