wart problem : पुणे : अंगावर चामखीळ असणे ही तशी गंभीर बाब नाही. मात्र, त्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरावर उद्भवणारे काही चामखीळ सामान्य नसून ते गंभीर बाबी दर्शवू शकतात. प्रदूषण, धूळ, माती यांमुळे त्वचेवर डाग किंवा मुरुम येणं ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु त्वचेवर दिसणार्या मुरुमांसारख्या चामड्यांमुळे संसर्ग दिसून येतो. धूळ आणि अस्वच्छेतेमुळे चामखीळ निर्माण होऊ शकतात.
पायांच्या तळव्यावर काही चामखीळ दिसतात. हे मस्से मध्यभागी लहान काळ्या ठिपक्यांसारखे दिसतात. हे अनेकदा वेदनादायक असतात. त्वचेवर कापलेल्या ठिकाणी ह्युमन पॅपिलोमाव्हायरसच्या प्रवेशामुळे चामखीळ होऊ शकते. महिलांना भुवया किंवा हनुवटीभोवती ते दिसणे सामान्य आहे. कारण पार्लरमध्ये थ्रेडिंग आणि वॅक्सिंगमुळे संसर्ग होऊ शकतो. चामखीळ घालवण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र, चामखीळ रोखणे हे काही शक्य नाही. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्यांचा संसर्ग नक्कीच टाळता येऊ शकतो.
कपडे, टॉवेल, वॉशक्लोथ, नेल कटर, रेझर किंवा इतर वैयक्तिक वस्तू दुसऱ्यांच्या वापरु नका. दुसऱ्या व्यक्तीच्या चामखीळांना स्पर्श करू नका. चामखीळ असलेल्या ठिकाणी खाजवण्याचा देखील प्रयत्न करू नका, अशा काही गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.