सध्या अनेकांकडे मोबाईल फोन आहे. काही लोकांकडे स्मार्टफोन तर काही लोकांकडे बेसिक फोन पाहिला मिळतोच. याच फोनच्या वापरामुळे टेलिमार्केटिंगचे प्रमाणही वाढले आहे. अनेकांना फोनवर दररोज स्पॅम कॉल येतात. हे कॉल केवळ लोकांना त्रास देत नाहीत, तर अनेक वेळा फसवणूकही करतात.
फसवणूक करणारे दररोज वेगवेगळ्या पद्धती अवलंबत असतात. आजकाल व्हॉट्सॲपवरही स्कॅम कॉल येऊ लागले आहेत. मात्र, आपण ते टाळूही शकतो. यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपवर काही सेटिंग्ज कराव्या लागणार आहेत. त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp उघडा. नंतर होम स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन उभ्या डॉट्सवर क्लिक करा.
यानंतर Settings पर्यायावर क्लिक करा. नंतर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्ही प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा. स्क्रीन खाली स्क्रोल करा आणि कॉल्स पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला सायलेन्स अननोन कॉलरचा पर्याय मिळेल. ते चालू करा. पर्याय चालू करण्यासाठी, त्याच्या समोर टॉगल चालू करा. यानंतर तुमच्या फोनवर अनोळखी नंबरवरून येणारे कॉल म्यूट केले जातील. अशा पद्धतीने तुम्ही WhatsApp वरून येणारे हे स्पॅम कॉल थांबवू शकता.