कुर्डूवाडी : समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना कौतुकाची थाप दिली तर त्यांना अजून काम करण्यासाठी प्रेरणा देते. असे मत माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मांडले.
कुर्डूवाडी येथील विठ्ठल मंदिरात संत सेवा मंडळाकडून समाज सेवा गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले. यावेळी बोलताना वरील मत आमदार शिंदे यांनी मांडले. यावेळी संजय पाटील घाटणेकर, ह.भ.प.प्रकाश महाराज जाधव ,फुलचंद धोका, आगरचंद धोका आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, आ.बबनराव शिंदे यांच्या हस्ते स्व.सुभाष पंढरीनाथ कुबेर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श समाज सेवा पुरस्कार राहुल धोका यांना देण्यात आला. तर ह.भ.प कै. श्री व सौ दिगंबर बाबुराव वाघमारे ( कोळी ) यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श सामाजिक पुरस्कार नागनाथ कुबेर यांना दिला. वैकुंठवासी ह.भ.प दशरथ बुवा व रुक्मिणीमाई सातव यांच्या स्मरणार्थ आध्यत्मिक पुरस्कार शिवाजी गवळी यांना दिला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, मानपत्र ,शाल , श्रीफळ असे आहे. तर यावेळी डॉ.जयंत करंदीकर यांनी मानपत्र वाचन केले
यावेळी नरेंद्र साळुंखे ,अर्जुन गाडे ,किरण गोडसे,शाम वाघमारे ,चंपालाल सोनिमिंडे ,राजू हलकुडे ,जगन्नाथ क्षीरसागर ,शंकर वेदपाठक ,शंकर सुतार ,हरीभाऊ बागल ,प्रा.मोहन खरात ,अजीत पवार ,साधना करंदीकर ,सुनिता कुबेर,राजश्री भाटे,जयश्री करंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.