नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून Apple च्या iPhone ची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. आता यावर्षी Apple एक खास iPhone मॉडेल लाँच करणार आहे, ज्याचे नाव iPhone 17 Air. iPhone 17 Air हा ॲपलचा आतापर्यंतचा सर्वात स्लीम आणि हलका स्मार्टफोन असणार आहे.
iPhone 17 Air सध्याच्या iPhone 16 Pro पेक्षा 2mm स्लीम असणार आहे. iPhone 17 Air ची रुंदी 6.255mm असेल. आतापर्यंतचा सर्वात स्लीम iPhone मॉडेल iPhone 6 होता जो 6.9mm होता. पण iPhone 17 Air आणखी स्लीम असणार आहे. याचे डिझाईन स्टेनलेस स्टील किंवा टायटॅनियमचे नसून कंपनीने फक्त ॲल्युमिनियमचा वापर केला आहे. iPhone 17 Air मध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले असू शकतो आणि त्यात A19 चिपसेट वापरला जाणार आहे. डायनॅमिक आयलंडचा आकार कमी होईल आणि तो अधिक सडपातळ होईल.
iPhone 17 Air चे कॅमेरा लोकेशन देखील बदलेल. iPhone 17 Air च्या मागील टॉप सेंटरमध्ये एक कॅमेरा मॉड्यूल असेल, पण त्यात फक्त एक कॅमेरा असेल. जर तुम्ही Pixel 8 Pro चा कॅमेरा मॉड्युल पाहिला असेल तर ते असेच काहीतरी असू शकते. iPhone 17 Air मध्ये अँटी-रिफ्लेक्टीव्ह कोटिंग वापरली जाईल जी स्क्रॅच प्रतिरोधक असणार आहे.
iPhone 17 Air मध्ये 24-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल आणि तो 6 एलिमेंट लेन्सही असणार आहे. आतापर्यंत Apple ने आपल्या iPhones मध्ये 12 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा दिला आहे.