नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार, स्मार्टफोन आणण्याचा कंपनीचा प्रयत्न असतो. पण अनेक मोबाईलप्रेमी Apple iPhone च्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे. त्यातच आता Apple ने iOS 18.1 अपडेट केला आहे. त्यातून AI चा सपोर्ट मिळणार आहे.
Apple च्या मते iOS 18.1 बीटा 1 सह सर्वात खास आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे Apple Intelligence. या फीचरच्या मदतीने तुम्ही व्याकरण तपासू शकाल. आपण ई-मेल किंवा संदेश देखील लिहू शकाल. Apple चे AI कोणताही लेख तीन स्तरांवर पुन्हा लिहू शकतो. हे कोणतीही ओळ हायलाईट करण्यास सक्षम असेल. नवीन अपडेटसह प्रदान केलेले क्लीन अप टूल फोटोमधील मजकूर किंवा नको असलेल्या गोष्टी काढून टाकण्यास समर्थ असतील.
Apple ने चार नवीन iPhone लाँच केले आहेत. ज्यात iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यांचा समावेश आहे. iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये, iPhone 16 Plus ची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये आणि iPhone 16 Pro Max ची सुरुवातीची किंमत रुपये 1,44,900 आहे.