नवी दिल्ली : आपण देखील Apple चा iPhone किंवा MacBook खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, Apple Days Sale आता सुरु झाला आहे. या सेलदरम्यान मोठ्या डिस्काउंटमध्ये फोन खरेदी करता येऊ शकणार आहे.
Apple Days Sale हा सेल विजय सेल्सवर सुरू झाला आहे. या सेलदरम्यान Apple च्या अनेक प्रॉडक्टवर सूट देण्यात आली आहे आणि बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. Apple Days Sale दरम्यान, iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, Apple iPad, Apple MacBook, Airpods यांसारखे गॅजेट्स डिस्काउंटमध्ये खरेदी करता येतील. विजय सेल्स ॲपल डेज 5 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.
या सेलदरम्यान यूजर्स बँक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. येथे तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. यासाठी एसबीआय कार्ड, आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँक कार्डचा वापर करणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या गॅजेट्सवर वेगवेगळे कॅशबॅक उपलब्ध आहेत.