पुणे – महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज, श्री गणेश आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या गाडीत मूर्ती असल्याने तिरुपती बालाजी देवस्थानने प्रवेश नाकारल्याचा दुसरा व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यामुळे आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपतीच्या दर्शनाला जावे की, नाही असा सवाल भाविकांमध्ये उपस्थित झाला आहे. तर या घटनेमुळे शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपतीच्या दर्शनाला गाडीमधून नांदेडचे एक कुटुंब चालले होते. तेव्हा गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, श्री गणेश आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या गाडीत मूर्ती असल्याने चेकपोस्ट थांबविण्यात आले. त्यानंतर गाडीतील मूर्ती काढा नाही तर पुढे जाऊ देणार नाही, असे त्यांना चेकपोस्टवर सांगण्यात आले. प्रवेश नाकारल्यानंतर मी तेथील प्रमुख अधिकाऱ्याला देखील जाऊ देण्याची विनंती केली, मात्र त्यांनीही आम्हाला जाऊ दिले नाही. तेथील अधिकाऱ्यांनी तिरुपती बालाजीच्या सेक्शनच्या नियमाप्रमाणे अश्या मुर्त्या गाडीतून घेऊन जाण्यास परवानगी नाही.
नांदेडच्या कुटुंबाने तिरुपती बालाजीचे सेक्शन दाखवा म्हणाले. तर अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. आणि गाडीतील मुर्त्या जबरदस्तीने काढून घेतल्या. आणि त्यानंतरच तिरुमाला तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी चेकपोस्टवरून सोडण्यात आले.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
दरम्यान, गेल्या दोन दिवसापूर्वी असाच एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. तेव्हा त्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज यांची गाडीत मूर्ती असल्याने तिरुपती बालाजी देवस्थानने प्रवेश नाकारल्याचा आरोप केला होता. तेव्हा तिरुमाला तिरुपती संस्थानकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून तो व्हायरल व्हिडिओमधून करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वाहन अलिपिरी चेक पॉइंटवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवून त्याची तपासणी केली होती. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ओळखली. आणि त्यांना तिरुमला येथे जाऊ दिले, असे तिरुमाला तिरुपती संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयाने पत्रकात म्हटले आहे.