उरुळी कांचन, (पुणे) : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवारी (ता. ०८) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ५ अंगणवाडी केंद्रांनी राष्ट्रीय मोहिमेची जनजागृती करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ पायी रॅली काढण्यात आली.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील इरिकेशन कॉलनी ते तुपे वस्ती रोड पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषा बालकांनी परिधान केल्या होत्या. या रॅलीत आंगणवाडीच्या सेविका व मुलांचे पालक सहभागी होऊन व “भारत माता की जय”, “तिरंगा झेंडा देशाची शान पोषक आहारला पहिला मान”, अशा घोषणा देण्यात आल्या.
१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘आजादी का अमृत महोत्सव’ ‘हर घर तिरंगा झेंडा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी देशप्रेमी, लहान थोर ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, सहभागी होत आहेत.
यावेळी भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष शुभम वलटे, अमित तुपे, सुनंदा खेडेकर, शोभा शिवरकर, आशा लोंढे, रूपाली कोतवाल, सारिका म्हस्के, अंजना बडेकर, आश्विनी खंडागळे, कमल टिळेकर, कल्पना म्हात्रे, अंजना बनकर, आदी रॅलीत सहभागी झाले होते.