मुंबई : राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. देश-विदेशात सर्वीकडे या लग्नाची चर्चा सुरु आहे. भारतातील एक सर्वात मोठा लग्न सोहळा म्हणून याकडे पाहिलं जात आहे. मुंबईत 12 जुलैपासून सुरू झालेला हा कार्यक्रम तीन भव्य दिवस चालणार आहे. हा नेत्रदीपक कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक मोठ मोठी लोकं सहभागी झाली आहेत. 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शुभ विवाह पार पडला आहे.
यानंतर 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद दिले जात आहेत. या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी अनेक मोठी लोकं आली आहे. 14 जुलै रोजी मंगल उत्सव या भव्य स्वागत समारंभासह समाप्त होणार आहे. लग्नासाठी आमंत्रित असणाऱ्या पाहुण्यांच्या यादीमध्ये जग भरातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय आयकॉन, व्यावसायिक, राजकारणी आणि क्रीडा जगतातील अनेक मंडळी सहभागी झाले होते.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपल्या लाडक्या मुलाच्या लग्नात सगळी हौस पुरवली आहे. मार्चमध्ये जामनगरमध्ये आधी तीन दिवसीय प्री-वेडिंग पार्टी झाली. यासाठी देखील अनेक मोठी लोकं उपस्थित होती. रिहाना, एकॉन आणि दिलजीत दोसांझ यांनी उपस्थितांचं मनोरंजन केलं. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांसारखे अनेक अब्जाधीश सहभागी झाले होते.
पाहुण्यांचे जोरदार स्वागत..
आपल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी अंबानी कुटुंबाने कोणतीही कसर सोडलेली दिसली नाही. पाहुण्यांना आलिशान भेटवस्तू देण्यात आल्या. याशिवाय पाहुण्यासाठी खाजगी चार्टर फ्लाइटची सुविधा करण्यात आली होती. लुई व्हिटॉन बॅग, सोन्याच्या चैन आणि डिझायनर शूजपर्यंत अनेक भेटवस्तू देण्यात आल्या.
इतका आला खर्च
अंबानी यांच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या कलाकांरांना अंबानी कुटुंबाला प्रचंड रक्कम दिली. या लग्न सोहळ्यासाठी अंदाजे 5,000 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. जगातील हे सर्वात महागडं लग्न ठरलं आहे. याआधी प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या विवाहसोहळ्यासाठी 1,361 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. शेख हिंद बिंत बिन मकतूम आणि शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या लग्नात 1,144 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला होता.