पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी आणि नात्यातील दुरावा यामुळे महाराष्ट्राचे राजकारण देशभरात चर्चेचा एकच विषय होता. या पार्श्वभूमीवर, २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर होतोय. त्यानुसार मतमोजणीला सुरुवात झाली असून प्राथमिक कलामध्ये बारामतीमधून युगेंद्र पवार आघाडीवर आहेत.