नवी दिल्ली : प्रसिद्ध टेक कंपनी Sony ने आपला नवा AI प्रोसेर असणार टीव्ही लाँच केला आहे. या टीव्हीमध्ये 4K डिस्प्लेसह अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. हा टीव्ही कंपनीच्या शक्तिशाली AI प्रोसेसर XR सह मिळत असून, हा टीव्ही 55 इंच आणि 65 इंच साईजमध्ये उपलब्ध आहे.
Sony कंपनीने आपली नवीन OLED टीव्ही सीरिज Bravia 8 लाँच केली आहे. हा टीव्ही कंपनीच्या AI प्रोसेसर XR सह मिळत आहे. यामध्ये चांगला डिस्प्ले देण्यात आला असून, टीव्हीमध्ये XR 4K अपस्केलिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा टीव्ही 2K रिझोल्यूशन गुणवत्तेसह मिळत आहे. या टीव्हीमध्ये दिल्या जाणाऱ्या इतर फीचर्समध्ये XR कॉन्ट्रास्ट बूस्टर, XR OLED मोशन आणि XR क्लियर इमेज यांचा समावेश आहे.
शक्तिशाली आवाजासाठी कंपनीने या टीव्हीमध्ये अकोस्टिक सरफेस ऑडिओ टेक्नॉलॉजी दिली आहे. या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स अॅडॉप्टिव्ह कॅलिब्रेटेड मोड आणि सोनी पिक्चर्स कोअर कॅलिब्रेटेड मोड प्री-इन्स्टॉल आहेत. कंपनीने Bravia 8 सीरीजमध्ये नवीन प्राईम व्हिडिओ कॅलिब्रेटेड मोडदेखील देत आहे.