Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन-शिंदवणेतील शेती भांडारांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाची धाड; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 5 August 2026, 16:28

उरुळी कांचन : उरुळी कांचन व शिंदवणे परिसरातील बियाणे, खते व कीटकनाशके विक्रेत्यांच्या मनमानी आणि बेकायदेशीर कारभारावर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

विलंबनाचा आदेश धुडकावून बेकायदेशीरपणे बियाणे विकणारे उरुळी कांचन येथील ‘साई शेती भांडार’ आणि मुदत संपलेला परवाना वापरून अनाधिकृत ठिकाणी खते व कीटकनाशकांची विक्री करणारे शिंदवणे येथील ‘कौशल्या शेती भांडार’ या दोन दुकानदारांविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे हवेली तालुक्यातील बनावट व बेकायदेशीर कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे धाबे पुरते दणाणले आहेत.

पहिल्या घटनेत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय दिनकर पाटील (वय- 55 रा. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उरुळी कांचन येथील पुणे-सोलापूर रस्त्यावर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या ‘साई शेती भांडार’ या दुकानाची 16 जुलै 2026 रोजी तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी साठा नोंदवही न ठेवणे, परवान्यात उत्पादक कंपनीचा समावेश न असणे आणि इतर गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या.

याप्रकरणी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे यांनी 22 जुलै रोजी सुनावणी घेऊन ‘साई शेती भांडार’चा बियाणे विक्री परवाना 15 दिवसांसाठी निलंबित केला होता. असे असतानाही रविवारी (ता. 02) सायंकाळी 6 वाजता भरारी पथकाचे धनंजय पाटील, कृषी अधिकारी अशोक वेताळ आणि मोहीम अधिकारी विनय कदम यांनी अचानक दुकानाची पाहणी केली. त्यावेळी दुकान सुरू असल्याचे आणि 28 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत पालक, मका, काकडी व शेपूच्या बियाणांची बेकायदेशीर विक्री केल्याचे बिल पुस्तकावरून उघडकीस आले.

 

शासकीय आदेशाचा भंग करून विनापरवाना बियाणे विक्री केल्याप्रकरणी दुकानाचे मालक बाळासाहेब उल्हास साळुंखे (वय -45, रा. गुळवंची, ता. जत, जि. सांगली) यांच्याविरोधात बियाणे नियंत्रण आदेश 1983आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 (2)(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत पुणे जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी विनय दिलीपराव कदम (वय-46, रा. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिंदवणे (ता. हवेली) येथील ‘कौशल्या शेती भांडार’ या दुकानाची 2 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजता भरारी पथकाने तपासणी केली.

तपासणीदरम्यान दुकान चालक पोपट तुकाराम महाडीक (वय -50, रा. शिंदवणे, ता. हवेली) यांच्या बियाणे व खते विक्री परवान्याची मुदत 23 नोव्हेंबर 2025 रोजीच संपल्याचे निष्पन्न झाले. तरीही कोणतीही नूतनीकरण प्रक्रिया न करता ते विनापरवाना खते व बियाण्यांची विक्री करत होते. तसेच, कीटकनाशक विक्रीचा परवाना उरुळी कांचन-जेजुरी रोड (कॅनाल शेजारी) या जागेचा असताना, त्यांनी परस्पर ‘वळती फाटा’ (मिळकत नं. 286 ब) या अनधिकृत ठिकाणी साठवणूक व विक्री सुरू ठेवली होती. याप्रकरणी विविध कलमान्वये दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक रोखणे, निकृष्ट व बनावट बियाण्यांचा पुरवठा थांबवणे आणि कृषी क्षेत्राचे नुकसान टाळण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सदर दोन्ही प्रकरणांत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post

मुख्यमंत्री फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! 2029 च्या निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना अल्टीमेटम, घेतला मोठा निर्णय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp