Crime : देशात सद्या IAS पूजा खेडकरसह माजी IAS अभिषेक सिंह यांच्यानंतर आता IPS रश्मी करंदीकर चर्चेत आल्या आहेत. त्या आपल्या नवऱ्याच्या चुकीच्या कृत्यांमुळे चर्चेत आहेत. IPS रश्मी करंदीकर यांचे पती पुरूषोत्तम चव्हाण यांना टीडीएस रिफंड फसवणूक प्रकरणात अटक झाली आहे.
त्यांच्याबद्दल नव नवीन खुलासे समोर येत आहेत. ऑगस्ट 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान व्यावसायिक राजेश बटरेजाकडून कथित पैसे आणि कागदपत्रांनी भरलेली बॅग आणण्यासाठी पुरूषोत्तम चव्हाण रश्मी करंदीकर यांच्यासाठी तैनात दोन कॉन्स्टेबल्सना पाठवलं होतं. पुरुषोत्तम चव्हाणला टप्याटप्याने 10.40 कोटी रुपये दिल्याच बटरेजाने कबूल केलं आहे.
प्रवर्तन निर्देशालयने अलीकडेच 263 कोटी रुपयांच्या आयकर टीडीएस रिफंड फसवणूक प्रकरणात पूरक आरोपपत्र दाखल केले आहे. चव्हाण, बटरेजा, कर सल्लागार अनिरुद्ध गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. त्याशिवाय मेसर्स एजी इंटरप्रायजेज, मेसर्स यूनिवर्सल मार्केटिंग एंड एडवायजरी सर्विसेज एलएलपी (यूएमएएस) आणि ड्वालॅक्स एंटरप्रायजेज प्रायवेट लिमिटेड विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
कोर्ट काय म्हणतंय?
विशेष पीएमएलए न्यायाधीश एसी डागा यांनी ईडीच्या तक्रारीची दखल घेतली. आरोपी व्यक्तीचा गुन्ह्यामध्ये थेट सहभाग होता. अन्य आरोपींना हवाला चॅनलच्या माध्यमातून भारतातून दुबई आणि दुबईहून भारतात पैसे ट्रान्सफर करायला मदत केली.
चव्हाणला झाली अटक
एजेंसीने बटरेजाची जबानी सुद्धा नोंदवली. ऑगस्ट 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान अनेक टप्प्यात चव्हाणला 10.40 कोटी रुपये रक्कम देण्यात आली. पुरूषोत्तम चव्हाणला मे महिन्यात अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.