पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे.
सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच कमाईची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे बँकेचा परवाना रद्द केला आहे. असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट सांगितले आहे. आणि बँक १० ऑक्टोबर रोजी कामकाजाच्या वेळेनंतर व्यवसाय करू शकणार नाहीत. त्यामुळे बँकेला बँकिंग व्यवसायापासून बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, बँकेचे ९९ टक्के ठेवीदार व त्यांच्या संपूर्ण ठेवी ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत मिळविण्यास पात्र आहेत. १४ सप्टेंबरपर्यंत एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी १५२.३६ कोटी रुपये भरले होते. लिक्विडेटर नियुक्त रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्राचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, यांना बँकेचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश पारित करण्यास आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्यास सांगितले आहे.