Admirable : बीड : आई हा दोनच अक्षरी शब्द आहे, पण तो किती थोर आहे, हे आपल्याला माहिती आहे. एखादा त्रीमुवनाचा जरी मालक झाला तरी जर त्याला आई नसेल तर तो त्रीमुवनाचा स्वामी भिकारीच म्हटला जातो. त्यामुळेच स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते. मात्र बीडमधील तीन भावांनी आईच्या निधनानंतर तिच्या स्मृती कायम आपल्या सोबत राहाव्यात यासाठी चक्क आपल्या आईचं मंदिर उभं केलं आहे.
नऊ लाख रुपये खर्चून उभारले आईचे मंदिर
सावरगाव येथील राधाबाई खाडे यांनी राजेंद्र खाडे, विष्णू खाडे आणि छगन खाडे या तीन मुलांना मोठ्या मेहनतीतून लहानाच मोठं केलं. जेमतेम शिक्षण शिकवलं. मात्र, वर्षभरापूर्वी राधाबाई यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (Admirable) आईच्या अचानकपणे जाण्याने तिन्ही भावांवर दुःखाचे डोंगर कोसळले.
आईच्या निधनानंतर तिच्या स्मृती कायम आपल्या सोबत राहाव्यात. यासाठी या तिन्ही भावांनी तिचा मंदिर बनवण्याचा निर्णय घेतला. केवळ निश्चय करूनच ते थांबले नाहीत. तर त्यांनी तातडीने मंदिराचे काम सुरू केले.(Admirable) १० बाय १३ च्या जागेत या मंदिर उभारणीचे काम सुरू झाले. सहा महिन्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी शिल्पाकृती असलेली अतिशय आकर्षक असे सजीव वाटावी अशा प्रकारची मूर्ती बसवण्याचे ठरवले.
दरम्यान, मूर्तिकाराचा शोध सुरू केल्यानंतर पुण्यातील कातोरे या मूर्ती बनवणाऱ्या शिल्पकाराची माहिती त्यांना मिळाली. मुलांनी त्यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती सांगितल्यानंतर ते देखील ही मूर्ती बनवण्यास तयार झाले. (Admirable) तब्बल चार ते पाच महिने या मूर्तीवर काम करून त्यांनी अतिशय आकर्षक व भक्ताक्षणी सजीव वाटावी अशा प्रकारची राधाबाई खाडे यांची सुंदर मूर्ती तयार केली. पावणे तीन फूट उंच अशी मूर्ती त्यांनी बनवली असून, या मंदिरासाठी व मूर्तीसाठी सर्व मिळून तब्बल नऊ लाख रुपये खर्च आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sushma Andhare news : ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याकडून सुषमा अंधारे यांना मारहाण