उत्तरप्रदेश: प्रयागराजमध्ये मोठ्या भव्य स्वरुपात कुंभमेळ्याचं आयोजन केलं जात आहे. कुंभमेळ्यात लाखों भाविक येणार असून यात व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तीसुद्धा सहभागी होणार आहेत. मेळा प्राधिकारणाने या कुंभमेळ्यासाठी सर्व सोई-सुविधांची तयारी केली आहे. या सुविधा देण्यासाठी नियमित कंट्रोल रूम, प्रोटोकॉल अधिकाऱ्यांची तैनाती आणि २५० तंबूची क्षमता असलेलं सर्क्रिट हाऊस उभारण्यात आलं आहे. या तंबूत अधिकाऱ्यांना राहण्याची सुविधा असणार आहे.
नदीच्या घाटावर अंघोळ करण्यासाठी खास सुविधा
यासह पर्यटन विकास विभागाकडून ११० काटेजची टेंट सिटी आणि सेवा देणाऱ्यांच्या माध्यमातून २२०० काटेजची टेंट सिटी विकसीत केली जाणार आहे. तसेच नदीच्या घाटावर अंघोळ करण्यासाठी काही खास सुविधाही असणार आहेत. या मेळाव्यासाठी १५ केंद्रीय आणि राज्य विभागाकडून २१ छावण्या उभारल्या जाणार आहेत. येथे विभाग अधिकाऱ्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महाकुंभमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांच्या सुविधांची सोय करण्यात आली आहे.
व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींसाठी एक कंट्रोल रुम तयार करण्यात आले आहे. हे चोवीस सक्रिय असणार आहे. या कंट्रोल रुममध्ये अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत. महाकुंभमध्ये विशेष व्यक्तींसाठी एक मेळा क्षेत्रात ५ वेगवेगळ्या स्थानांवर सर्किट हाऊस बनवण्यात आलं आहे. या सर्किट हाऊसमध्ये २५० टेंटची क्षमता असणार आहे. याची बुकिंग असणार आहे, हे प्राधिकरणाच्या वेबसाइटवर देण्यात आलं आहे.
विभागानुसार कॅम्प आणि राहण्याची सोय
महाकुंभमध्ये राज्य सरकारकडून एकूण ३६ विभागांतील अधिकाऱ्याऱ्यांसाठी छावण्या बनण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये राहण्यासाठी काटेजची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींसाठी २१ अतिथी गृहांची सोय करण्यात आली आहे. यात ३१४ खोल्या असणार आहेत. महाकुंभच्या दरम्यान भाविकांना अंघोळ करण्यासाठी विशेष घाट तयार करण्यात आला आहे. या घाटांवरून नदीत जेटी आणि मोटर बोटची सुविधा देण्यात आली आहे. जेणेकरून भाविक सहजरीत्या अंघोळ करू शकणार आहेत. ही व्यवस्था काही विशेष भाविकांसाठी असणार आहे.