मुंबई : सैनिकी मुलींचे वसतिगृह कलिना, सांताक्रुझ पूर्व, मुंबई येथे अतिरिक्त सहाय्यक अधीक्षकपद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी येत्या १५ जानेवारी २०२५ रोजीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जाधव यांनी केले आहे.
युद्ध, विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक, आजी सैनिक यांची पत्नी या पदासाठी अर्जदार असावी (युद्ध विधवेस / विधवेस प्राधान्य). शिक्षण दहावी उत्तीर्ण असावे. तसेच एमएससीआयटी पास व टायपिंग येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच वयोमर्यादा ४५ वर्षांच्या आत असावे.
या पदासाठी दरमहा २४ हजार ४७७ इतके मानधन देण्यात येणार आहे. अर्जासोबत युद्ध विधवा, विधवा, माजी-आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रति जोडाव्यात. निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचे आयत्यावेळी बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आल्याचे शासनाने म्हणणे आहे.