पुणे : पुण्यासह अनेक शहरांमध्ये रस्त्यावरील सिग्नलवर तृतीयपंथी पैसे मागत असतात. एवढंच नाही तर कोणी पैशाला नकार दिला, तर तृतीयपंथींकडून जबरदस्ती देखील केली जाते. त्यामुळे वाहन चालकांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत असतो. अशातच आता पुणे पोलिसांनी तृतीयपंथींबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शहरात यापुढे तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागता येणार नाहीत. तसेच घरगुती समारंभमध्ये देखील आमंत्रणशिवाय हजेरी लावता येणार नाही. यासंदर्भात पुणे पोलिसांनी तृतीयपंथींवर काही निर्बंध लावले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांकडून शहरातील तृतीयपंथींवर काही निर्बंध लागू केले आहेत. तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागता येणार नाही. याबाबत पुणे पोलिसांनी निर्णय घेतला आहे. शहरातील अनेक सिग्नलवर तृतीयपंथी सर्रास पणे नागरिकांकडून पैसे घेतात. त्यामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून पुणे पोलिसांकडे यापूर्वी अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींनंतर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
रस्त्यावरील सिग्नलवर उभे असलेल्या वाहनांना जर त्रास दिला, तर तृतीयपंथीवर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सिग्नलबाबतच नाही तर घरगुती समारंभमध्ये देखील आमंत्रणशिवाय हजेरी लावण्यास तृतीयपंथींना प्रतिबंध करण्यात आले आहेत. आजपासून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. जर पुणे पोलिसांच्या आदेशांचे तृतीयपंथींनी पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.