पुणे : आचार्य चाणक्य हे एक कुशल अर्थतज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. त्यांनी चाणक्य नीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या व्यक्तीने नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्याने माणूस आपले जीवन यशस्वी करू शकतो. आचार्य चाणक्य यांच्यानुसार कोणत्या वस्तू नेहमी साठवल्या पाहिजेत, ते जाणून घेऊयात..
औषध
आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीने नेहमी औषध साठवून ठेवावे. कठीण प्रसंगी ते कामी येतात. इमर्जन्सीमध्ये तुमच्यासोबत औषध नसणे तुम्हाला अडचणीत आणू शकते.
अन्न
आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीच्या घरात नेहमी अन्नाचा साठा असायला हवा. असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते. घरात आलेल्या पाहुण्याला कधीही उपाशी राहू देऊ नका.
गुरूची शिकवण
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने नेहमी आपल्या गुरूची शिकवण लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. ते ऐकून गोळा केले पाहिजेत. असे केल्याने तुम्ही प्रत्येक समस्येवर सहज मात करू शकता.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने नेहमी आपल्या गुरूची शिकवण लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. ते ऐकून गोळा केले पाहिजेत. असे केल्याने तुम्ही प्रत्येक समस्येवर सहज मात करू शकता.
धन
आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीने अनावश्यक खर्च टाळावा. यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे नेहमी पैसे वाचवा. कठीण काळात हे तुमच्यासाठी उपयोगी पडते.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीने अनावश्यक खर्च टाळावा. यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे नेहमी पैसे वाचवा. कठीण काळात हे तुमच्यासाठी उपयोगी पडते.