-सागर जगदाळे
भिगवण : इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी गावाजवळ चार चाकी गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे आज पहाटे अपघात झाला आहे. या अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेत.
याबाबत अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथे वैमानिक बनण्याचे प्रशिक्षण घेणारे चार विद्यार्थी बारामतीहून भिगवण च्या दिशेने टाटा हॅरीहर या चारचाकी गाडीतून निघाले होते. आज पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान लामजेवाडी गावाजवळ वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. याअपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला तर हे दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात गाडीमध्ये महाराष्ट्र, बिहार, दिल्ली व राजस्थानची एक मुलगी होती.
अपघाताची माहिती मिळताच जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी ‛आपुलकीची सेवा’ ॲम्बुलन्स मालक केतन वाघ यांनी आपल्या ॲम्बुलन्स मधून पुढील उपचारासाठी भिगवण आय सी यु दवाखान्यात दाखल केले. अपघाताचे नक्की कारण समजू शकले नाही
सविस्तर वृत्त थोड्यावेळात