सुरेश घाडगे
परंडा : संपुर्ण जगातील अंधकार दुर करून मानवतेचा व भक्तीचा खरा मार्ग दाखवणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती रविवारी (ता. ०९) मोठया उत्साहात शहरात मिरवणुक काढून साजरी करण्यात आली. परंडा भूईकोट किल्यातील जामा मसजीद येथून सकाळी ९ वाजता मिरवणूकीचा शुभारंभ करण्यात आला. या मिरवणूकीत उंट, घोडे, झेंडे व मार्गावर झेंडे, पताका व विद्युत रोषणाई आकर्षक करण्यात आली होती.
मिरवणूकीत सहभागी झालेल्या मुलांना मंगळवार पेठ येथे मीमभाई ग्रुपच्या वतीने, टिपू सुलतान चौक येथे राजमाता जिजाऊ बहूउद्देशीय सामाजीक संस्था यांच्या वतीने व मंडई पेठ येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुस्लिम बांधवांना समोसा व मसाला दूध वाटप करण्यात आले. आझाद चौक येथे सरबत वाटप, मंडई पेठ, निजामपुरा, मंगळवार पेठ, पल्ला गल्ली, नालसाब गल्ली, टिपू सुलतान चौक, मंडई पेठ, अमानुल्ला गल्ली, कुरेशी गल्ली या मार्गवरून मिरवणूक हजरत खॉजा बद्रोद्दीन दर्गाह येथे पोहचली व फातेहाखाँनी करून मिरवणूकीचा समारोप करण्यात आला.
पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख होता. जुलुस मिरवणूक यशस्वीतेसाठी जुलूस कमेटीचे अध्यक्ष हाफीज मलीक, हाफीज गुलाम गौस, मौलाना जफर काझी, मौलाना समीर, हाफिज निजाम, हाफीज समीर, हाफीज कदिर, हाफीज हुसेन, हाफीज जावेद, हाफीज जुबेर, हाफीज महेबुब, हाफीज शहनवाज, हाफीज समीर, मौलाना मुस्तफा, किल्ला मसजीदचे जब्बार मुजावर यांनी परिश्रम घेतले.