लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत ईद-ए-मिलाद हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात रविवारी (ता. ०९) साजरी करण्यात आली.
दोन वर्षानंतर जुलूस मिरवणुक निघाली असल्याने सुमारे शकडो जणांच्या सहभागाने प्रतिकात्मक मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पवित्र ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंतीची तयारी मुस्लिम बांधवांनी जोरदार केली होती. ईदनिमित्त ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शानाखाली पोलिसांनी मिरवणुकीसह पुणे-सोलापूर महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील बागुल शहा वली दर्गा या ठिकाणापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी लोणी काळभोर गावातून मिरवणूक काढण्यात आली. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन या परिसरात मिरवणूक आली असता रमजान तांबोळी, उमरखान, इजाज खान यांनी मिरवणुकीतील बांधवाना फळांच्या ज्यूस वाटप केले. तसेच आलेल्या प्रत्येक नागरिकाला गुलाबाचे फुल व श्रीफळ देऊन सत्कार केला. ईद-ए-मिलादनिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते.
यावेळी हनीफ शेख, उमर खान, इजाज खान, फिरोज खान, समिर खान, इरफान शेख, ताहीर शेख, नासीर पठान, शरीफ खान, अखिल इनामदार, अखिलभाई सय्यद, गफूर शेख, नईम इनामदार, आदम इनामदार, मोहसीन तांबोळी, आदि उपस्थित होते.
ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण आहे. या निमित्ताने भरगच्च धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शहर व मुस्लिम मोहल्ल्यातील मशिदी, दर्गा शरीफसह मुस्लिम बांधवांची घरे व दुकानांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सदरची मिरवणूक हि कदमवाकवस्ती हद्दीतील लोणी स्टेशन येथून इंदिरानगर, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील पाषाणकर बागेतून सदर ठिकाणी काढण्यात आली होती.