अजित जगताप
वडूज : जगभर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. तरीही वाचन संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. ही गौरवास्पद बाब ठरली आहे. वाचन चळवळ जोमात आहे. हुतात्म्यांची नगरी असलेल्या वडूज ता.खटाव येथे नगरसेवक अभय देशमुख व पुस्तक विश्व यांच्या वतीने माजी आमदार मा.प्रभाकरजी घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य दिव्य पुस्तक प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.
या प्रदर्शनात हुतात्म्यांची नगरी असलेल्या वडूज मध्ये जनता व वाचकांचा सहभाग दिसून आला आहे. ब्रिटिश काळात स्वातंत्र्याच्या चळवळीत दि ९ सप्टेंबर रोजी शहीद वीरांनी बलिदान दिलेले आहे. तसेच दुष्काळी भागात श्रमदानातून पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून परिसर जलमय करण्याची किमया केलेली आहे. याच धर्तीवर वाचन चळवळ जोपासण्यासाठी वडूज शहरात कार्य सम्राट नगरसेवक अभय देशमुख यांच्या संकल्पनेतून ‘भिलारे ते वडूज’ असे पुस्तकांचे गाव निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.
मा.आ प्रभाकर घार्गे यांचा वाढदिवस ते दि २ ऑक्टोबर गांधी जयंती या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजे पर्यन्त वडूज पंचायत समितीच्या समोर वडूज या ठिकाणी प्रदर्शन सुरू झालेले आहे.वाचकांच्या प्रतिसादाने आणखी मुदत वाढविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. या प्रदर्शना मध्ये ऐतिहासिक, सामाजिक,आत्मचरित्र, कथा -कादंबऱ्या वैचारिक लेख ,सोशल मीडिया,युगपूरुषाचे चरित्रं प्रबोधनाची निवडक पत्रे,स्थानिक लेखकांचे साहित्य ,स्वामिनाथन आयोग ,आरोग्य सल्ले आधुनिक विणकाम,विवाह सोहळा व रुकवताचे पदार्थ,जेष्ठ साहित्यीक डॉ.आ.ह.साळुंखे यांची वैचारिक पुस्तके, वैज्ञानिक साधन सामग्री ,छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा-सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित पुस्तके या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहेत.
दोन दिवसात अठरा ते वीस हजार रुपयांचे पुस्तके विक्री झालेली आहेत. पुस्तक खरेदी वर पंचवीस टक्के सवलत असल्याने वाचकवर्ग खुश आहेत.विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला, युवक, वाचक वर्ग उत्स्फूर्तपणे या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत. मा.आ.प्रभाकर घार्गे,डॉ दिलीप येळगाव कर,रणजित देशमुख,मनोज घोरपडे,सौ इंदिरा घार्गे,नगराध्यक्षा सौ मनिषा काळे,अभय देशमुख,डॉ महेश गुरव,प्रिती घार्गे, ऍड अनिल गोडसे, महेश घार्गे, वैभव पवार, श्रीमती शशिकला देशमुख,भरत देशमुख, अशोकआबा गोडसे,राजाभाऊ चव्हाण, मोहन देशमुख, विजय शिंदे, ,पुस्तक विश्व चळवळीचे व्यवस्थापक नवनाथ जगताप,ईश्वर पटेल, रविंद्र माळी, प्रिया घार्गे, हिंमत माने यांच्या उपस्थितीत या पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.
सेवानिवृत्त कर्मचारी ते शालेय विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. आजपर्यंत बहुसंख्य वाचकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. या ठिकाणी वडूज परिसरासह खटाव तालुक्यातील पुस्तकप्रेमीनी भेट द्यावी अशी संयोजकाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. आज वडूज एस टी आगार प्रमुख व्ही एस देशमुख, रि.पा.ई. चे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल गडांकुश,राष्ट्रीय काँग्रेस खटाव तालुका अध्यक्ष डॉ.संतोष गोडसे,दत्ता केंगारे,जयवंत पाटील,डॉ कुंडलिक मांडवे व मान्यवर पत्रकार बांधव, वाचक व साहित्य प्रेमी यांनी भेट देऊन पुस्तके खरेदी केली. अशी माहिती संयोजकांनी दिली..