सुरेश घाडगे
Aashadhi Vari परंडा : संत ज्ञानेश्वर माऊली महाराज (आपेगाव) (Aashadhi Vari) रथ-दिंडी-पालखी-वारकरी शनिवारी (दि.२४ ) रात्री माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व विश्वासराव पाटील यांच्या येथे स्नेहभोजन व मुक्काम करून रविवारी (दि. २५) सकाळी दिपक थोरबोले यांच्या फार्म हाऊसवर अल्पोपहार घेऊन श्रीक्षेत्र पंढरपुरकडे सकाळी नऊ वाजता मार्गस्थ झाली. (Aashadhi Vari)
यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, विश्वासराव पाटील, जि. प. माजी सदस्य सिध्देश्वर पाटील, दिपक थोरबोले, युवा नेते रणजित पाटील, परंडा पंचायत समितीचे माजी उपसभापती मेघराज पाटील, विश्वजित पाटील, सागर पाटील, महेश थोरबोले, सुनिल थोरबोले, माजी नगराध्यक्षा सिंधूबाई डाके यांनी पालखी प्रमुख ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांचा सत्कार केला.
शिवाजीराव कदम, सुभाष शिंदे, अनिल शिंदे, गणेश चव्हाण, बाळासाहेब पाटील, संजय कदम, धनंजय बुलबुले, राजेंद्र रणभोर, बाबुराव गायकवाड, ज्योतिराम शिंदे, जितेंद्र चौधरी, किशोर जाधव, प्रशांत गायकवाड, मलिक सय्यद, शरीफ तांबोळी, विशाल पवार, दादा डाके, सचिन वारे आदी यावेळी उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे जन्मगाव असलेल्या आपेगाव येथून आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूर पांडुरंगाच्या दर्शनासाठी सालाबादप्रमाणे याहीवर्षी पारंपरिक रथात माता पित्याची मूर्ती ठेऊन भव्य रथ-दिंडी-पालखी सोहळा हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
सकाळी दिपक थोरबोले यांच्या माऊली विसावा या फार्महाऊसवर नाष्टा, चहा घेऊन पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. तसेच आवारपिंपरी येथे वारकऱ्यांसाठी भोजन ठेवण्यात आले होते.
चरण पादुका पालखी सोहळ्यास 881 वर्षांची परंपरा
ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे जन्मगाव असलेल्या आपेगाव येथून माता-पिता विठ्ठलपंत व रुक्मिणी माता यांच्या चरण पादुका पालखी सोहळ्यास ८८१ वर्षाची परंपरा असून, माऊलीचे पणजोबा त्र्यंबकपंत यांनी शके ११२९ ला पालखी सुरु केली. ती परंपरा आजही चालु आहे. माऊली आपल्या आई-वडिल व भांवडांना घेऊन पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला जाणारी महाराष्ट्रातील एकमेव पालखी आहे.
– हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर.