अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रकरणी एकावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पराग ज्ञानेश्वर बोटकर (वय २२ वर्षे, रा. गोलेगाव रोड शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना तरडोबाची वाडी शिरूर येथील एका मंदिराजवळील शेतामध्ये घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील गोलेगाव येथील युवतीला रात्रीच्या सुमारास पराग बोटकर या युवकाने तर्डोबाची वाडी येथील एका मंदिराजवळील शेतामध्ये घेऊन जात युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या युवतीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगत थेट शिरुर पोलीस स्टेशन गाठले. याबाबत पिडीत युवतीने शिरुर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी पराग ज्ञानेश्वर बोटकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहे.