पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हादरवून टाकणारा प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या मैत्रिणीने तिला घरी बोलावून तुला इथेच तिघांबरोबर थांबावे लागेल, नाही तर आम्ही मारुन टाकू, अशी धमकी देऊन तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार आरोपीच्या घरी ३ जानेवारी रोजी घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी मैत्रिणीसह दोघांना अटक केली असून दोघांचा शोध सुरु आहे.
भरत रोहिदास गव्हाणे (वय-२८) आणि सुनोमो भरत गव्हाणे ऊर्फ सुमोना नूर इस्लाम शेख (वय२४, दोघे रा. वडगाव, सिंहगड रोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मैत्रिण हिने फिर्यादी तरुणीला आपल्या घरी बोलावून घेतले. तेथे तिला तिने तुला इथेच या तिघांसोबत थांबाव लागेल, नाही तर आम्ही तुला मारुन टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यावेळी तिला आरडाओरडा केला तर मारण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकार सांगितला. पोलिसांनी तातडीने तिच्या मैत्रिणीसह दोघांना अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्रेहल थोरात करीत आहेत.