(Maternity Leave ) मुंबई : महिला कर्मचाऱ्याला मुलाला जन्म दिल्यानंतर प्रसूती रजेचा हक्क आहे. मूल जन्माला आले आहे आणि तिच्याकडे बाल संगोपन रजा घेण्याचा पर्याय आहे. या आधारावर तिला प्रसूती रजेचा लाभ (Maternity Leave) नाकारता येणार नाही. प्रसूती रजा आणि बाल संगोपन रजा या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याचा उद्येशही वेगळा आहे. या दोन्ही गोष्टीचा लाभ घेण्याचा अधिकार महिला कर्मचाऱ्याला आहे.असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.
180 दिवसांची प्रसूती रजा मागितली…!
एटाच्या सहाय्यक शिक्षिका सरोज कुमारी यांनी याविषयी याचिका केली होती. याचिकाकर्त्याने 180 दिवसांची प्रसूती रजा मागितली होती. ही मागणी फेटाळण्या आल्यानंतर महिला शिक्षिकेने याचिका दाखल करत आव्हान देण्यात आले.
याचिकाकर्त्याने प्राथमिक शिक्षणाधिकारी, एटा यांच्याकडे प्रसूती रजेसाठी अर्ज केला होता. बीएसएने 14 नोव्हेंबर 2022 रोजी तिचा अर्ज फेटाळला. मुलाच्या जन्मानंतर प्रसूती रजा मिळणार नाही, याचिकाकर्ता महिला बाल संगोपन रजा घेऊ शकते, असे बीएसएने म्हटले होते.
यावर न्यायमूर्ती आशुतोष श्रीवास्तव यांनी निर्णय दिला आहे. मातृत्व लाभ कायद्यानुसार, महिलेला बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर प्रसूती रजा घेण्याचा अधिकार आहे. हा संसदेने संमत केलेला कायदा आहे. बीएसएने कायदा समजून घेण्यात चूक केली असून पगार रोखण्याचा आदेशही बेकायदेशीर आहे, असे त्यांनी निकाल देताना स्पष्ट केले आहे. तसेच बीएसएचे आदेश रद्द केले आहेत. अधिवक्ता सत्येंद्र चंद्र त्रिपाठी यांनी याचिकेवर युक्तिवाद केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Old Pension Scheme : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरटीओतील कामकाजावर परिणाम ; नागरिकांचे होतायत हाल!
Crime News | कुख्यात गुंड निलेश घायवळचे फ्लेक्स लावणे पडले महागात ; तिघांवर गुन्हा दाखल!