पुणे : पुण्यातील थेऊरच्या जय मल्हार हॉटेल जवळ किरकोळ वादातून गोळीबार करण्यात आला आहे. प्लॉटिंगच्या वॉचमनने लघवी करणाऱ्या अज्ञात कारमधील टोळक्याला हटकल्यानंतर कार मधील चौघांनी वॉचमन आणि त्याच्या पत्नीला मारहाण करत हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. अज्ञातानी दगड आणि हाताने केलेल्या माराहाणीत वॉचमन अक्षय चव्हाण आणि त्याची पत्नी शीतल चव्हाण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत अधिक माहिती अशी की, प्लॉटिंगच्या वॉचमनने लघवी करणाऱ्या अज्ञात कारमधील टोळक्याला हटकलं. त्यानंतर संतापलेल्या टोळक्याने वॉचमन अक्षय चव्हाण आणि त्याची पत्नी शीतल चव्हाण यांना जबर मारहाण करत हवेत गोळीबार केला आहे. मारहाण करणाऱ्या अज्ञात कार चालकासह तिघा जणाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भानुदास शेलार अजय मुंडे आणि सतीश उर्फ नाना शेलार या तिघासह एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. मात्र, यावेळी आरोपींनी हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार करण्यात आला आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपीकडून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अक्षय साहेबराव चव्हाण असं फिर्यादीचे नाव असून,मारहाणीत फिर्यादीची पत्नी जखमी झाली आहे. लोणीकंद पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एकाने हवेत गोळीबार केला होता. यावेळी आरोपींकडून हत्यार देखील जप्त करण्यात आलं आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.