– अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर तळेगाव न्हावरा रोड वर आज सोमवारी (दि. 24) जून रोजी पहाटे साडेचार पाचच्या दरम्यान अपघात झाला आहे. चालकाला डुलकी लागल्याने टेम्पोची झाडाला धडक लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहतूक करणारा टेम्पो एम एच 16 सी डी 6245 अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो भरधाव वेगाने तळेगावजवळून शिक्रापूर कडे जात असताना त्रिमूर्ती मंगल कार्यालयाच्या अलीकडे 100 मीटर अंतरावरती चालकाला डुलकी लागली. त्यावेळी भल्या मोठ्या लिंबाच्या झाडाला टेम्पो धडकला गेला.
या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. तरी मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेत चालक किरकोळ जखमी झाला आहे .