Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ सामना रंगणार !निवडणुकीची तारीख अन् उमेदवारांबाबत मोठी अपडेट समोर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 8 September 2026, 13:50

बारामती : बारामतीत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. येथील प्रसिद्ध श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीच्या निमित्ताने ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना पुन्हा एकदा रंगणार आहे.

बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 2026 मध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी 11 ऑक्टोबरला मतदान आणि 12ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.यासाठी अर्ज भरण्याची मुदत 7 ते 11 सप्टेंबरपर्यत असणार आहे.या कारखान्याचे कार्यक्षेत्र बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण या चार तालुक्यांतील सुमारे 150 गावांमध्ये पसरलेले आहे.एकूण 21जागासाठी ही निवडणूक होणार आहे.यापूर्वी 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाने दणदणीत विजय मिळवला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी ‘शेतकरी पॅनेल’च्या माध्यमातून स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून तेच तेच लोक संचालक पदावर आहेत. त्यामुळे तरुण, उच्चशिक्षित आणि अनुभवी उमेदवारांना संधी देऊन बदलाची गरज आहे. माळेगाव कारखान्याप्रमाणे इथे अडचणी येऊ नयेत म्हणून सभासदांच्या हितासाठी हे पाऊल उचलले आहे,” असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार गट पूर्ण ताकदीने उतरणार आहे. “अजितदादांनी राजकारण बाजूला ठेवून या कारखान्याला प्रगतीपथावर नेले. तोच वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही सर्वसमावेशक पॅनल उभे करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. अजितदादांच्या निधनाला अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नाही, त्यामुळे सर्व पक्षांनी एकत्र येत दोन्ही बाजूंच्या चांगल्या लोकांना संधी देऊन निवडणूक बिनविरोध करणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत त्यांनी मांडले.

आता या निवडणुकीमुळे बारामतीतील सहकार क्षेत्रातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘आठ दिवसांत जमीन नावावर कर नाहीतर…’ खेडमध्ये जमिनीच्या वादातून भावांमध्ये तुफान राडा; धमकी देत लोखंडी पाईपने मारहाण….

Wednesday, 9 September 2026, 15:57

“राहुल गांधी VVIP नाहीत…” लवकर सुनावणीच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने सुनावलं!

Wednesday, 9 September 2026, 15:56

LPG सिलेंडरच्या नियमांत मोठा बदल! 14 सप्टेंबरपूर्वी हे काम करा, नाहीतर मिळणार नाही सिलेंडर

Wednesday, 9 September 2026, 15:53

करोडपती सासऱ्याच्या हत्येसाठी सुनेचे 3 प्लान! A फेल, B फेल अन् C मध्ये झाला रक्तरंजित शेवट

Wednesday, 9 September 2026, 15:40

सरकारचा नकार, जरांगेंचा निर्धार! 12 तारखेला निर्णय ठरला; मराठ्याचं वादळ पुन्हा मुंबईत धडकणार

Wednesday, 9 September 2026, 15:34

पुण्यात IT कंपनीचा ‘सोर्स कोड’ चोरी करून थेट दुबई गाठली! मास्टरमाइंड पुणे विमानतळावर उतरताच जेरबंद

Wednesday, 9 September 2026, 15:29
Next Post

जरांगे पाटलांसोबतच्या चर्चेला पूर्णविराम? विखेंचा स्पष्ट शब्दांत इशारा; ‘आता शिष्टमंडळ जाणार नाही’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp