Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

करोडपती सासऱ्याच्या हत्येसाठी सुनेचे 3 प्लान! A फेल, B फेल अन् C मध्ये झाला रक्तरंजित शेवट

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 9 September 2026, 15:40

मुंबई: प्रसिद्ध व्यावसायिक आणि औषध विक्रेते विनीत मनोचा यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येचा कट त्यांच्या सुनेने रचल्याचा पोलिसांचा दावा असून, यासाठी तिने घरातील नोकरासह इतर व्यक्तींची मदत घेतल्याचे तपासात समोर आले आहे. विनीत यांच्या हत्येसाठी एकाच नव्हे, तर तीन वेगवेगळ्या योजना तयार करण्यात आल्या होत्या. प्लान A, प्लान B आणि प्लान C अशा पद्धतीने हा कट आखण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या योजनेत घराबाहेर विनीत यांच्या कारला अपघात घडवून त्यांची हत्या करण्याचा विचार होता. मात्र, सुपारी किलर विशालने हा प्लान नाकारला. अपघात घडवताना स्वतःचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती. तसेच पोलिसांच्या तावडीत सापडण्याची भीती असल्याने त्याने हा पर्याय स्वीकारला नाही.

यानंतर दुसरी योजना तयार करण्यात आली. घरात प्रवेश करून उशीने तोंड दाबून विनीत यांची हत्या करायची आणि त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे भासवायचे, असा या योजनेमागील विचार होता. त्यामुळे हत्येचा संशय निर्माण होणार नाही, असा आरोपींचा अंदाज होता.

मात्र, पुढे तिसरी योजना राबवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. शालू ही 9.36 वाजता पती सुब्रत आणि मुलगा श्रीजय यांच्यासोबत घराबाहेर गेली. त्यानंतर 9.44 वाजता दोघे आरोपी डुप्लिकेट चावीच्या मदतीने घरात दाखल झाले. ते शालूच्या खोलीत जाऊन विनीत यांच्या परतण्याची वाट पाहत बसले. खोलीचा दरवाजा थोडा उघडा ठेवण्यात आला होता, तर लाईट बंद ठेवण्यात आली होती.

 

सुमारे 74 मिनिटांनी विनीत घरी परतले. कपडे बदलल्यानंतर त्यांनी जेवण केले, मिठाई खाल्ली आणि पाणी प्यायले. त्यानंतर त्यांची नजर सुनेच्या खोलीच्या किंचित उघड्या दरवाजाकडे गेली. आत मांजर गेली असावी, असा त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी खोलीत जाऊन लाईट सुरू केली. त्यावेळी दोन्ही आरोपी त्यांच्या समोर आले. विनीत यांनी त्यांना जाब विचारल्यानंतर विशालने चाकूने हल्ला केल्याचे पोलिस तपासात सांगण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर विनीत खाली कोसळले. त्यांची हालचाल तपासल्यानंतर आरोपी वेगवेगळ्या दिशेने घराबाहेर गेले. सीसीटीव्हीत आरोपी कैद होण्याचा धोका असतानाही त्यांनी हा प्लान का निवडला, असा प्रश्न पोलिसांनी विचारला. त्यावर उशीने हत्या करण्याची पहिली योजना यशस्वी झाली असती तर शालू हृदयविकाराचा बनाव करून मृत्यूचे कारण वेगळे दाखवणार होती, त्यामुळे तपासाची शक्यता कमी राहिली असती, असा दावा आरोपींनी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर हायवेवर ‘थार’वाल्या दारुड्यांचा धुडगूस!उरुळी कांचनजवळ ट्रॅव्हल्स अडवून तोडफोड ; संतप्त नागरिकांनी दोघांना तुडवले

Sunday, 25 October 2026, 11:16

करंदीतील चासकमान कालव्यात अज्ञाताने टाकली सहा मृत डुकरे ; ग्रामपंचायतीकडून विल्हेवाट

Sunday, 25 October 2026, 11:03

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Sunday, 25 October 2026, 10:06

पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांना दुष्काळात मोठा दिलासा! गाव सोडलं तरी मिळणार मोफत रेशन; लाभासाठी नवा नियम काय?

Sunday, 25 October 2026, 9:46

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42
Next Post

LPG सिलेंडरच्या नियमांत मोठा बदल! 14 सप्टेंबरपूर्वी हे काम करा, नाहीतर मिळणार नाही सिलेंडर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp