पुणे : नवीन वाहन खरेदी केल्यानंतर पसंतीचा क्रमांक घेण्यासाठी सध्या लाखो रुपये मोजण्याची वाहन मालकांची तयारी असल्याने प्रादेशिक परिवहन प्राधिरकणाच्या महसुलात मोठी भर पडत आहे.
गेल्या दीड वर्षात पुण्यात ४६ हजार वाहनमालकांनी ‘चॉइस क्रमांका’ ला पसंती दिली असून, ‘पुणे आरटीओ’ला त्याद्वारे ३८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चॉइस क्रमांकाची मागणी वाढत असून, दर वर्षी अशा पद्धतीने पसंतीचा क्रमांक घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते. त्यामुळे आरटीओ च्या महसुलात वाढ होत असून, या शुल्कात अलीकडेच वाढ केल्याने आगामी काळात आणखी निधी आरटीओला प्राप्त होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आरटीओ कडे प्रामुख्याने १, ९, ९९, १००, ७७७, ९९९, ७१२, ९९९९, ५१५१, ११११, १२३४, १२१२ या क्रमांकाला मोठी मागणी असते. चॉइस क्रमांक मिळविण्यासाठी विहित नमुन्यात ‘आरटीओ’कडे अर्ज दाखल करावा.
‘आरटीओ’ पुणे यांच्या नावाने डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वत: जमा करावा, अशी माहिती ‘आरटीओ’कडून देण्यात आली.
सॅन २०२१-२२ साली तब्बल २६ हजार ३४८ ग्राहकांनी चॉईस नंबर घेत जवळपास २२ कोटी पाच लाख रुपयांचा महसूल मिळवून दिला. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात २० हजार ३२ ग्राहकांनी तब्बल १६ ७५ लाख रुपयांचे महसूल मिळाला.
अजून या वर्षातील ६ महिने बाकी असून अजून किती महसूल मिळेल हे वर्षाअखेरीस लालू शकेल.