पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करुन तिला लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटचा ताबा घेऊन त्यावरुन इतर अनोळखी इंस्टाग्राम युझरशी अश्लिल चॅट करुन तिचे त्याच्याकडे असलेले नग्न व अर्धनग्न व पूर्ण कपडे घातलेले फोटो व्हायरल करुन तिच्याकडे पैशांची मागणी केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी नराधम तरुणाला अटक केली आहे. श्रीयश रुपेश पतंगे (वय २१, रा. शुक्रवार पेठ) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पिडित मुलीच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून २०२४ चे पहिला आठवडा ते ४ जानेवारी २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला श्रीयश पतंगे याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला वेळोवेळी लॉजवर घेऊन जाऊन तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तिच्या इंस्टाग्राम युजर आयडी त्याच्या मोबाईल फोनमध्ये लॉग इन करुन घेतले. फिर्यादी यांच्या मुलीचा फोन तिच्या आईच्या ताब्यात असताना पतंगे याने पिडीताचे इंस्टाग्राम अकाऊंटवरुन इतर अनोळखी इंस्टाग्रामवर पिडिताशी चॅट करीत असल्याचे भासवले.
त्यामध्ये अश्लिल चॅट व शिवीगाळ केली. तिचे नग्न, अर्धनग्न तसेच पूर्ण कपडे घातलेले फोटो व्हायरल केले. ते पिडिताचे इंस्टाग्राम युजर आयडी यावर पाठवून तिला धमकावून तिच्याकडे पैशांची मागणी केली. तिच्या इंस्टाग्रामवर क्यु आर कोड पाठवून ३०० रुपये पाठवण्याची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम तरुणाला अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके करीत आहेत.