पुणे : पुण्यात कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप येथील एका एनजीओमधील बाथरूममध्ये पंधरावर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. १६) घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी ऑगस्ट महिन्यापासून या एनजीओमध्ये राहण्यास होती. शनिवारी तिने येथील बाथरूममध्ये गळफास घेतला.
या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. अल्पवयीन मुलीने कुठल्या कारणातून आत्महत्येसारखे पाऊल उचलले, याचा पोलिस तपास करत आहेत.